Farmer’s Scheme Updates: शेतकरी बांधवानो, केवायसी केलीय का? ‘या’ 2 पिकांसाठी सरकार देतेय अनुदान , जाणून घ्या kyc ऑनलाईन कशी करावी

Farmer’s Scheme Updates: मागील वर्षीच्या खरीप हंगामात (२०२३) कपाशी आणि सोयाबीन पीक लागवड केलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु ही मदत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. सरकारच्या निर्देशानुसार, केवायसी शिवाय शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही.

Farmer’s Scheme Updates: कोणाला मदत मिळणार?

राज्य सरकारने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार:

  • २ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना १,००० रुपये.
  • २ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५,००० रुपये (२ हेक्टरच्या मर्यादेत) इतकी मदत दिली जाईल.

मदतीसाठी पात्रता:

शेतकऱ्यांनी कपाशी किंवा सोयाबीन पिकाची लागवड करून ती ई-पीक पाहणी पोर्टलवर नोंदवलेली असावी. जर ई-पीक पाहणीवर नोंद नसेल तर शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालयातून सातबारा उताराऱ्यावर पिकाची नोंद करणे आवश्यक आहे.

सामायिक खातेधारकांसाठी विशेष नियम:

काही शेतकऱ्यांची जमिनी सामायिक खातेदारांच्या नावावर असतात. अशा खात्यांवर मदतीची रक्कम जमा करण्यासाठी, इतर खातेदारांची संमती घेऊन स्वयंघोषणा प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. यासाठी प्रति पीक दोन हेक्टरची मर्यादा स्वतंत्रपणे लागू होईल. Farmer’s Scheme Updates

ई-केवायसी प्रक्रिया:

ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन पद्धती आहेत:

  1. कृषी सहायकाच्या मदतीने ई-केवायसी:
  • शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या कृषी सहायकाशी संपर्क करावा.
  • कृषी सहायक त्यांच्या लॉगिनमधून शेतकऱ्यांच्या आधारला जोडलेल्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठवून ई-केवायसी करून घेतील.
  1. ऑनलाईन ई-केवायसी प्रक्रिया:
  • शेतकऱ्यांनी https://scagridbt.mahait.org या संकेतस्थळावर जावे.
  • मुख्य पानावर “Disbursement Status” पर्यायावर क्लिक करावे.
  • शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक प्रविष्ट करावा.
  • आधारशी संबंधित मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी टाकून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी.

महत्त्वाचे:

ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच शेतकऱ्यांना मदतीची रक्कम मिळेल. म्हणून शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून त्यांना कपाशी आणि सोयाबीन पिकांसाठी सरकारने दिलेली मदत मिळू शकेल.

शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रियेत तत्काळ सहभाग घेऊन आपल्या अधिकाराचा लाभ घ्यावा!

मुख्यमंत्री वयोश्री योजना: ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारची नवी योजना, ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 3000 रुपयांची आर्थिक मदत 

2 thoughts on “Farmer’s Scheme Updates: शेतकरी बांधवानो, केवायसी केलीय का? ‘या’ 2 पिकांसाठी सरकार देतेय अनुदान , जाणून घ्या kyc ऑनलाईन कशी करावी”

Leave a Comment