मुख्यमंत्री वयोश्री योजना: ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारची नवी योजना, ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 3000 रुपयांची आर्थिक मदत | Mukhyamantri Vayoshree Yojna

Mukhyamantri Vayoshree yojna: राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र सरकारने “मुख्यमंत्री वयोश्री योजना” (Mukhyamantri Vayoshree Yojna) सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दरमहा ३००० रुपयांची आर्थिक मदत तसेच दैनंदिन जीवनातील सोयीसाठी आवश्यक उपकरणे दिली जातात. या योजनेत ४८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजना काय आहे?

मुख्यमंत्री वयोश्री योजना ही राज्यातील ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवली जाते. या योजनेद्वारे ज्येष्ठ नागरिकांना दरमहा ३००० रुपये दिले जातात. यासह, ज्यांना वृद्धावस्थेमुळे ऐकणे, दिसणे, चालणे यासारख्या समस्या निर्माण होतात, अशा नागरिकांना चष्मा, श्रवणयंत्र, व्हीलचेअर इत्यादी उपकरणे मोफत दिली जातात.

या योजनेत मिळणारी उपकरणे:

  • चष्मा
  • ट्रायपॉड
  • कमरेसंबंधीचा पट्टा
  • फोल्डिंग वॉकर
  • ग्रीवा कॉलर
  • स्टिक
  • व्हीलचेअर
  • कमोड खुर्ची
  • गुडघा ब्रेस
  • श्रवणयंत्र

Mukhyamantri Vayoshree Yojna- पात्रता

  • अर्जदार हा मूळचा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • अर्जदाराचे वय ६५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असावे.
  • अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख (2 Lakh) रुपयांपेक्षा कमी असावे.
  • अर्जदाराला शारीरिक किंवा मानसिक त्रास असावा.
  • अर्जदाराचे बँक खाते आधार कार्ड सोबत जोडलेले असावे.
  • राज्यातील किमान ३०% महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल.

आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • ओळखपत्र
  • आय प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • स्वत: ची घोषणा प्रमाणपत्र
  • समस्येचे प्रमाणपत्र
  • बँक खाते पासबुक
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो

अर्ज कसा करावा?

अर्जदाराने वरील आवश्यक कागदपत्रांसह समाजकल्याण विभागाकडे अर्ज सादर करायचा आहे. अर्जदाराने सर्व माहिती योग्य प्रकारे भरून कागदपत्रे जोडावी आणि विभागाच्या कार्यालयात सादर करावी. योजनेचा लाभ पात्र नागरिकांना देण्यात येईल.

मुख्यमंत्री वयोश्री योजना ही ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप उपयुक्त योजना आहे. योजनेच्या लाभाने त्यांचे जीवन अधिक सोयीस्कर आणि आनंदी होईल. जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती या योजनेसाठी पात्र असेल, तर या योजनेचा नक्कीच लाभ घ्या.

हे पण वाचा : Lakhpati Didi Yojana: लखपती दीदी योजना योजना काय आहे? महिलांना 5 लाख रुपयांपर्यंतची मदत

2 thoughts on “मुख्यमंत्री वयोश्री योजना: ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारची नवी योजना, ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 3000 रुपयांची आर्थिक मदत | Mukhyamantri Vayoshree Yojna”

  1. मे 70 साल का बुडा हु सुनाई कम देता है कमर मे दर्द और नजर भी कम हो गई है कुछ भी काम नही कर सकता हु ।

    Reply

Leave a Comment